शिवाजी पवळ
शहर प्रतिनिधी, श्रीगोंदा
**राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे का नाही**?
आज देशाच्या ७९ वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभर साजरा होत असताना. दुसरीकडे महाराष्ट्रभर दलित समाजावर अन्याय अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही.एकीकडे सत्ताधाऱ्यांनी समतेच्या नावाने मोठी भाषणे ठोकायची. तर दुसरीकडे त्यांच्या पिलावळींनी दलितांना ठोकून काढायचे. हे संपूर्ण महाराष्ट्रभर सर्रासपणे असे चालू आहे .
पुणे येथील कोथरूड प्रकरण ताजे असतानाच जालन्यामध्ये एका कुलकर्णी नावाच्या डीवायएसपीने एका आंदोलकाला सिनेस्टाईलने लाथ मारली. हे काय कमी होते,की सुरोडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या गावच्या दलित समाजातील विद्यमान सरपंच. मीनाक्षी रामदास सकट यांना गेल्या अनेक दिवसापासून गावातील गावगुंड जातीयवादी लोक त्रास देत आहेत.
कोणत्याही सरपंचाकडून कधी असा गावचा विकास केला नाही त्यांनी गेल्या चार वर्षापासून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक प्रकारचे उपक्रम राबवणे, महिलांना न्याय देणे,गावातील दलित समाजाला सोबत घेऊन त्यांच्या उन्नतीसाठी झटणे असे काम मीनाक्षी सकट यांच्याकडून सतत चालू होते.
काल दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी काही गावगुंडांनी मीनाक्षी सकट ह्या तालुक्यातून आपल्या घरी जात असताना. त्यांच्यावर व त्यांच्या मुलावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात त्यांची गाडी ही पूर्णपणे जळाली असून. त्याही जखमी झाल्या. त्यांच्या लहान मुलाला मुका मार लागला आहे. हा सर्व प्रकार बघताना व महाराष्ट्रभर दलितांवर होत असलेले अन्याय अत्याचाराची घटना पाहताना हा महाराष्ट्र खरंच फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का ? हा महाराष्ट्र घटनाकार बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे का? परंतु येथील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याच्या धाक राहिलेलाच नाहीये. काल घटना घडून 24 तासापेक्षा अधिक कालावधी लोटून गेला. तरी सुद्धा हल्लेखोरांना अटक केली गेली नाही.
गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी म्हणून श्रीगोंद्यातील बहुजन समाजातील नागरिक पदाधिकाऱ्यांनी पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे आणि श्रीगोंदा पोलिस निरीक्षक किरण शिंदे भेटून यांना निवेदन दिले व निषेध नोंदवला.यावेळी उपस्थित पीडित मीनाक्षी सकट,आर.पी.आयचे नेते जिवाजीराव घोडके,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप,राष्ट्रवादी अजित दादा गटाचे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष कुणाल शिरवाळे, मातंग एकता आंदोलनाचे अध्यक्ष नंदकुमार ससाने, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड, शिवाजी घोडके, संदीप भोईटे शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख,अजित भोसले, राजू ससाने, अँड प्रेरणा धेंडे, रतन पवार निवेदन देतेवेळी उपस्थित होते जरा आरोपींना दोन दिवसात अटक केली नाही तर पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला..
