शिवाजी पवळ
शहर प्रतिनिधी श्रीगोंदा :
श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारांची कार्यकारणीची मुदत संपल्याने नवीन कार्यकारिणीची जोरदार मागणी होत असल्याने निवडणूक प्रक्रिया जोर धरत होती. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सचिव विश्वासराव आरोटे यांच्या सुचनेनुसार व अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ता घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांनी बिनविरोध निवड करण्याचा निश्चय केला. काही तांत्रिक अडचणीमुळे पहिल्यांदा मतांच्या स्वरूपात निवडणूक प्रक्रिया होणार होती. तालुकाध्यक्ष पदासाठी चार उमेदवार
रिंगणात उतरल्याने गोंधळ उडाला बिनविरोध
निवडीसाठी त्यांचे एक मत न झाल्याने चारही जणांनी माघार घेत पुण्यनगरीचे पत्रकार अमोल झेंडे यांना संधी मिळण्याची विनंती जिल्हाध्यक्ष दत्ता घाडगे यांना केली. घाडगे यांनी सहमती दर्शवत तालुकाध्यक्षपदी अमोल झेंडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी घाडगे यांनी पुढील कार्यकारणी जाहीर केली. जिल्हा उपाध्यक्ष माधव बनसोडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेंद्र राऊत, तालुकाध्यक्ष- अमोल झेंडे, सचिव अनिल तुपे, पत्रकार हल्ला कृती समिती तालुकाध्यक्ष नितीन रोही, शहराध्यक्ष- सोहेल शेख, सोशल मीडिया शफीक हवालदार, तालुकाउपाध्यक्ष सचिन शिंदे, नंदकुमार कुरुमकर, कार्याध्यक्ष- जावेद इनामदार, सल्लागार- श्रीरंग साळवे, खजिनदार- धनेश गुगळे, इलेक्ट्रिक मिडिया प्रमुख-किशोर मचे यांची निवड झाली. यावेळी वेळी ज्येष्ठ पत्रकार अंकुश शिंदे, प्रमोद आहेर, शकील भाई शेख, अमर घोडके यांच्यासह तालुक्यातील पत्रकार बंधू उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश ओहळ यांनी केले व आभार पत्रकार दादासाहेब सोनवणे यांनी मानले.
